भारताने उपांत्य फेरीत बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 80 धावा केल्या होत्या, भारताने हे लक्ष्य केवळ 11 षटकांत कोणतेही नुकसान न करता पूर्ण केले.
आता भारताचा सामना 28 जुलै रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. भारतीय संघ आता विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने केवळ 80 धावा केल्या. भारताने 11 षटकांत कोणतेही नुकसान न करता लक्ष्य गाठले. स्मृती मानधना हिने 55 धावांची तर शेफाली वर्माने 26 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. आता भारतीय संघ 28 जुलैला अंतिम फेरीत खेळताना दिसणार आहे.