प्रथम फलंदाजी करताना लव्हकिन अबेसिंघेच्या 110 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने केलेल्या 69 धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 46.2 षटकांत 173 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 21.4 षटकांत 3 गडी गमावत 175 धावा करून विजय मिळवला आणि विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला.श्रीलंकेचा कर्णधार विहास थेवमिकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
श्रीलंकेविरुद्धच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या वैभवच्या शानदार खेळीने दमदार सुरुवात केली. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. मात्र, 28 चेंडूत 34 धावा करून बाद झालेल्या आयुष म्हात्रेला विहास थेविमकाने बाद करून भारताला पहिला धक्का दिला. वैभवने मात्र तग धरून आपले अर्धशतक पूर्ण केले.
काही वेळाने विरान चामुदिथाने आंद्रा सिद्धार्थला बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. आंद्रे 27 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार मोहम्मद अम्मान आणि केपी कार्तिकेय यांनी भारताला विजयापर्यंत नेले. अम्मान 26 चेंडूत 25 धावा करून नाबाद राहिला आणि कार्तिकेय 14 चेंडूत 11 धावा करून नाबाद राहिला. दुबईत रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी होईल.