IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला

शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (10:45 IST)
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत आठ गडी गमावून 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 47.5 षटकांत 10 गडी गमावून 230 धावा केल्या. भारताला विजयासाठी 15 चेंडूत अवघ्या एका धावेची गरज असताना शिवम दुबे बाद झाला. यानंतर अर्शदीप सिंग फलंदाजीला आला आणि पहिल्याच चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. 
 
या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (4ऑगस्ट) आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. भारताकडून पहिल्या वनडेत कर्णधार रोहित शर्माने 58 धावा केल्या. त्याने 33 चेंडूत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 56 वे अर्धशतक झळकावले. त्याच वेळी, श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि चारिथ असलंका यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती