ते म्हणाले, सूर्यकुमारचे क्रिकेटसाठी सर्वोत्तम फलंदाजापैकी एक आहे. आम्हाला संघाच्या कर्णधाराची निवड करताना जो भविष्यात टीम इंडियासाठी जवळ जवळ सर्व सामने खेळेल असा कर्णधार निवडायचा होता. सूर्यकुमार यादव त्यासाठी योग्य आहे. असे आम्हाला वाटले.
तर पंड्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याकडे असलेले कौशल्य शोधणे फार कठीण आहे. तथापि, त्याच्यासाठी फिटनेस खरोखरच आव्हानात्मक आहे. अशा स्थितीत प्रशिक्षक, निवडकर्ता आणि संघ व्यवस्थापनाला ते थोडे अवघड जाते. हार्दिक अजूनही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे.
हार्दिकसाठी फिटनेस ही समस्या आहे. केवळ फिटनेसच नाही तर सूर्यकुमारमध्ये यशस्वी कर्णधार बनण्याची क्षमता आहे असे आम्हाला वाटते. दोन वर्षे खूप मोठा कालावधी आहे आणि या परिस्थितीत आपल्याकडे काहीतरी करून पाहण्याची वेळ आहे. जे खेळाडू आमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायची आहेत. या भूमिकेत आम्ही हार्दिकला अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो, असे आम्हाला वाटते. त्याने बॉल आणि बॅटने काय केले ते आपण या T20 वर्ल्ड कपमध्ये पाहिले आहे. अशा परिस्थितीत त्याची कामगिरी संघासाठी महत्त्वाची आहे, कर्णधारपदाचा मुद्दा नाही. या निर्णयासाठी आम्ही सर्व खेळाडूंशी बोललो.कर्णधारपदाचा निर्णय खूप विचार करून घेतला आहे. याबद्दल खूप विचार केला गेला आणि नंतर सूर्यकुमार यादववची निवड केली गेली.