भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला सहा विकेट्सने हरवून आपल्या मोहिमेची चांगली सुरुवात केली होती, तर पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध 60 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. कराचीमध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तान संघ दुबईला पोहोचला आहे.
गेल्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही आणि भारतीय फलंदाज त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन सुरुवातीपासूनच त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना रविवार, 23 फेब्रुवारी रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. टॉस त्याच्या अर्धा तास आधी, म्हणजे दुपारी 2:00 वाजता होईल.