Hazel Keech blessed with baby girl: बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच आणि माजी भारतीय क्रिकेटर युवराज सिंग दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. या जोडप्याच्या घरी लहान मुलीचे आगमन झाले आहे. दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. हेजल आणि युवराज याआधी एका मुलाचे आई-वडील झाले होते.
युवराज सिंगने पत्नी आणि दोन्ही मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हेजलने आपल्या मुलाला आपल्या मांडीवर घेतलेले दिसत आहे. त्याचवेळी त्याची मुलगी युवराज सिंगच्या मांडीवर दिसत आहे. यासोबत युवराजने लिहिले की, 'आम्ही प्रिन्सेस ऑराचे स्वागत करतो.'