गोव्याच्या पर्यटन विभागाने माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगला नोटीस पाठवली आहे. युवराज सिंगचा मोरजिममध्ये व्हिला आहे. व्हिला नोंदणी न करताच 'होमस्टे' म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. युवराजला ८ डिसेंबर रोजी सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. गोवा पर्यटन व्यवसाय कायदा, 1982 अंतर्गत नोंदणी केल्यानंतरच राज्यात 'होमस्टे' चालविला जाऊ शकतो.
पर्यटन व्यापार कायद्यांतर्गत मालमत्तेची नोंदणी न केल्याबद्दल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई का करू नये, अशी विचारणा नोटीसमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.