कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने आयपीएल 2025 च्या हंगामापूर्वी फलंदाज अजिंक्य रहाणेला संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले आहे, तर अष्टपैलू वेंकटेश अय्यर संघाचा उपकर्णधार असेल. रहाणेच्या नेतृत्वाखाली केकेआर संघ जेतेपदाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने प्रवेश करेल.वेंकटेश अय्यरला केकेआरने सर्वाधिक किमतीत खरेदी केले आणि तो आगामी हंगामात रहाणेसोबत एकत्र काम करेल.
कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यावर अजिंक्य रहाणे म्हणाला, आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या केकेआरचे नेतृत्व करणे हा सन्मान आहे. मला वाटते की आमचा संघ संतुलित आणि उत्कृष्ट आहे. विजेतेपदाचे रक्षण करण्याचे आव्हान पेलण्यासाठी मी सर्वांसोबत काम करण्यास उत्सुक आहे.”
रहाणेने2022 च्या हंगामात केकेआरसाठी सात सामने खेळले आणि 133 धावा केल्या