गंभीरची प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यानंतर भारताने केले लाजिरवाणे विक्रम!

सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (15:22 IST)
माजी फलंदाज गौतम गंभीरला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवल्यानंतर मीडियामध्ये मोठे दावे करण्यात आले. पण त्याच्या कोचिंगमध्ये भारतीय संघाची अवस्था वाईट आहे. आधी भारताला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले आणि आता तब्बल 36 वर्षांनंतर न्यूझीलंडने टीम इंडियाचा त्यांच्याच घरातच पराभव केला.

भारताने 27 वर्षात श्रीलंकेविरुद्ध कधीही द्विपक्षीय वनडे मालिका गमावलेली नाही. मात्र गंभीरची प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यानंतर भारताने श्रीलंकेकडून मालिका 2-0 अशी गमावली. आश्चर्याची बाब म्हणजे श्रीलंकेकडून पराभूत झालेल्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांचाही समावेश होता. या मालिकेतील तीनही सामन्यात भारतीय संघ ऑलआऊट झाला.

या वर्षात भारताला आतापर्यंत एकही एकदिवसीय सामना जिंकता आलेला नाही आणि आता या वर्षी एकही एकदिवसीय सामना खेळवला जाणार नाही

आता न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.या वर्षातील भारताचा घरच्या भूमीवर हा दुसरा कसोटी पराभव आहे. याआधी वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडने त्यांचा पराभव केला होता. यासह टीम इंडियाच्या नावावर आणखी एक लाजिरवाणा विक्रम जमा झाला आहे.
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती