बाजीप्रभू देशपांडे शौर्यगाथा दर्शविणारा चित्रपट 'पावनखिंड चा टिझर रिलीज

मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (14:48 IST)
हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट पावनखिंड हा अंगावर शहारा आणणारा आहे . या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर असून त्यांनी या चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे . हा चित्रपट पुढील वर्षी 21 जानेवारी 2022ला सिनेमा घरात प्रदर्शित होणार   आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजीराजेंच्या इतिहासावर आधारित असून आपल्या लाडक्या महाराजा छत्रपतींच्या सैन्यात 300 मावळांसह सिद्धी जौहरला खिंडीत रोखून धरणारे तसेच युद्धात आपल्या प्राणाचे बलिदान करणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या चित्तथरारक पराक्रमावर आधारित असलेला हा चित्रपट अक्षरश : अंगावर शहारे आणणारा आहे.  या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले आहे. मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी , दिप्ती के, अभिनेता चिन्मय मांडलेकर हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती