स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर चित्रपटाचे शूट, मराठीत पहिला प्रयोग

मंगळवार, 17 जुलै 2018 (08:51 IST)
दिग्दर्शक आणि लेखक सचिन कुंडलकर आता कुंडलकर एक संपूर्ण चित्रपटच स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर शूट करणार आहेत. या चित्रपटाच्या प्राथमिक तयारीला सुरुवात झाल्याचं त्यांनी स्वत:च्या फेसबुकच्या माध्यमातून सांगितलं आहे.
 
‘संपूर्णपणे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर शूट होत असलेली माझी पूर्ण लांबीची फिल्म. कामाच्या प्राथमिक तयारीला उत्साहाने सुरुवात. ह्या वेगळ्या प्रकारच्या चित्रपटात सामील झालेल्या माझ्या दोन आवडत्या कलाकारांचे स्वागत,’अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली आहे. त्यासोबतच सई ताम्हणकर आणि वैभव तत्त्ववादी यांचेही फोटो त्यांनी शेअर केले आहेत. या चित्रपटाची कथा काय असणार, आणखी कोणकोणत्या भूमिका त्यात असणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. तेव्हा स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर शूट झालेला पहिलावहिला असा अनोखा मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती