Moto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री

सोमवार, 21 मे 2018 (16:26 IST)
लेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे मोटो जी6. महत्त्वाचे म्हणजे याला ईकॉमकर्स वेबसाइट अमेजन इंडियावर लिस्टेड करण्यात आले आहे आणि यात नोटिफाइ बटण सक्रिय आहे. या फोनची किंमत किमान 16 हजार रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपनीने या फोनला मागच्या महिन्यात ब्राझीलमध्ये लॉच केले आहे.
 
मोटो जी6 स्पेसिफिकेशन 
ब्राझीलमध्ये लाँच झालेले मोटो जी6 प्रमाणे भारतात लाँच होणार्‍या फोनमध्ये 5.7 इंचेचा डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. हा फोन स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसरसोबत येईल ज्याची सर्वाधिक स्पीड 1.8 गीगाहर्ट्ज आहे. यात 506 जीपीयू, 3 जीबी रॅम, एंड्रॉयड 8.0 ओरियो आणि 3000 एमएएच अशी बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेर्‍याची गोष्टी केली ती मोटो जी6 मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे, तसेच मागच्या बाजूला 12 मेगापिक्सल+5 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. सध्या याबद्दल हे माहीत नाही आहे की भारतात लाँच होणारा मोटो जी6 भारतात लाँच होणार्‍या जी6 प्रमाणे असेल की नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती