७६ वर्षीय गॅस्टन यांच्या हृदयाचे ठोके वाढले असल्याचा अलर्ट त्यांच्या अॅपल वॉचवर येऊ लागला. ते तातडीनं रुग्णालयात गेले तिथे सगळ्या चाचण्या पार पडल्या. या चाचण्या पार पडल्यानंतर जवळपास ९० % ब्लॉकेज असल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. रुग्णालयात पोहोचण्यासाठी जरा उशीर झाला असता तर हृदयरोगाचा तीव्र झटका येण्याची शक्यता अधिक होती असंही डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. पण सुदैवानं वेळीच त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यांचे प्राण वाचले. जर अॅपल वॉचनं अलर्ट दिले नसते तर मात्र गॅस्टनच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असता.