नोकिया 6.1 स्मार्टफोनची लिस्टिंग

गुरूवार, 17 मे 2018 (12:00 IST)
नोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने भारतीय बाजारपेठेत गेल्या वर्षी नोकिया 6 हा स्मार्टफोन सादर केला होता. या वर्षाच्या प्रारंभी बार्सिलोना शहरात झालेल्या 'मोबाइल वर्ल्ड काँग्रेस'मध्ये याची नवीन आवृत्ती नोकिया 6 (2018) या नावाने जाहीर करण्यात आली होती. गत महिन्याच्या प्रारंभी याची 3 जीबी रॅम असणारी आवृत्ती ग्राहकांना सादर करण्यात आली होती. आता याची 4 जीबी रॅम असणारी आवृत्ती उपलब्ध करण्यात आली आहे. हे मॉडेल ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपिंग पोर्टलवरून 18,999 रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. याला कंपनीने नोकिया 6.1 असे नाव दिले आहे. याची सध्या या संकेतस्थळावर लिस्टिंग करण्यात आली असून 13 मे पासून प्रत्यक्षात हे मॉडेल ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. नोकिया 6.1 या मॉडेलमध्ये 5.5 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा (1920 बाय 1080 पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर आहे.
 
याची रॅम 4 जीबी व 64 जीबी स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील मुख्य कॅमेरा 16 ते सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या नोगट या प्रणालीवर चालणारे असून यात 3000 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टूथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-यूएसबी आदी फीचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाइट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.
 
नोकिया 6.1 या मॉडेलला एअरटेलची कॅशबॅक ऑफर लागू करण्यात आली असून याच्या अंतर्गत ग्राहकांना 2 हजार रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तर 'मेक माय ट्रिप' या अ‍ॅग्रीगेटरने देशांतर्गत हॉटेल्सच्या बुकिंगसाठी 25 टक्के सवलत देऊ केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती