'जिओ टीव्ही' युजर्स पाहाणार मर्जीनुसार प्रत्येक अँगलने मॅच

आता जिओचं मोबाईल टीव्ही अॅप 'जिओ टीव्ही' ने घोषणा केलीय की,  ३ देशांच्या क्रिकेट सीरिज दरम्यान युजर्सला मैदानातील कुठल्या अँगलने मॅच पहायची आहे, कुठल्या कॅमेऱ्याने पहायची आहे तसेच कुठल्या भाषेत कमेंट्री ऐकायची आहे याची निवड करु शकतात.
 
जिओ युजर्सला कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधेच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार प्रत्येक अँगलने मॅच पाहू शकतो. जिओ टीव्हीच्या माध्यमातून क्रिडाप्रेमी निडास ट्रॉफीचा आनंद लुटू शकतात. युजर्स पाच वेगवेगळ्या कॅमेरा अँगलने मॅचचा आनंद लुटू शकतात. क्रिकेटप्रेमी स्टम्प, माईक आणि स्टेडिअममधील माहौलच्या ऑडिओचा अनुभवही घेऊ शकतात. आपली आवडती भाषा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू आणि कन्नडमध्ये क्रिकेटची कॉमेंट्री ऐकू शकता. जहीर खान, आशीष नेहरा आणि गौरव कपूर सारख्या विश्लेषकांकडून विश्लेषण तसेच कमेंट्री ऐकू शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती