कान्स सरकारकडून ३ सिनेमांची निवड

फ्रान्समध्ये ८ मे ते १८ मे या कालावधीत होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात राज्य शासनाकडून पाठविण्यात येणाऱ्या ३ सिनेमांची निवड करण्यात आली आहे. इडक (मे.किया फिल्मस प्रा.लि.), क्षितीज (मे.मिडिया फिल्म क्राफट), पळशीची पी.टी. (मे.ग्रीन ट्री प्रोडक्शन) या तीन सिनेमांची निवड करण्यात आली आहे.
 
या सिनेमहोत्सवासाठी २६ मराठी सिनेमांचे परीक्षण करण्यात आले. या २६ सिनेमांतून समितीने उपरोक्त ३ सिनेमांची निवड कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी केली आहे. परीक्षण समितीमध्ये रघुवीर कुलकर्णी, (दिग्दर्शक, निर्माता), रेखा देशपांडे, (चित्रपट समिक्षक), अरुणा जोगळेकर, (पटकथाकार, दिग्दर्शक, निर्माता), प्रमोद पवार, (लेखक, अभिनेता), पुरुषोत्तम लेले, (निर्माता, दिग्दर्शक तथा महामंडळाचे अशासकीय सदस्य) या तज्ज्ञ सदस्यांचा समावेश आहे. या समितीनेच या तीन सिनेमांची निवड केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती