मिळालेल्या महतीनुसार दुबईतून सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला सोमवारी तिच्या ३ दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने अभिनेत्रीला २४ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राण्या रावला तुरुंगात पाठवल्यानंतर, तिच्या जामीन अर्जावर आज म्हणजेच मंगळवार, ११ मार्च रोजी सुनावणी सुरू होईल.