आमिर खान आणि जावेद अख्तर यांनी केली 'आमिर खान: सिनेमा का जादुगर'ची घोषणा! ट्रेलर प्रदर्शित!

सोमवार, 10 मार्च 2025 (11:45 IST)
‘पीव्हीआर’सह आणि जावेद अख्तर यांच्यासोबत साजरी होत आहे, आमिर खानच्या चित्रपटांची लक्षणीय कारकीर्द: 'आमिर खान: सिनेमा का जादुगर'! ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
 
‘पीव्हीआर’च्या 'आमिर खान: सिनेमा का जादुगर'मध्ये जावेद अख्तर सांगत असतात- "आमिरने मी लिहिलेल्या पहिल्या चित्रपटात काम केले होते," ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला!
 
एका महत्त्वपूर्ण सोहळ्यात, देशातील सर्वात मोठी आणि दर्जेदार सिनेमा प्रदर्शन कंपनी असलेल्या ‘पीव्हीआर आयनॉक्स’ने अभिमानाने ‘आमिर खान: सिनेमा का जादुगर’ हा सुपरस्टार आमिर खानच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाची आठवण करून देणारा एक विशेष चित्रपट महोत्सव घोषित केला. ही घोषणा झाल्यापासून, या महोत्सवाअंतर्गत त्यांच्या पिढीचा सर्वात प्रभावी अभिनेता आणि चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेल्या आमिर खानची चित्रपटांतील कारकीर्द पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला आहे.
 
या महोत्सवाविषयीचा उत्साह शिगेला पोहोचत असताना, अलीकडेच मुंबईत एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, जिथे दिग्गज पटकथा लेखक व गीतकार जावेद अख्तर आणि ‘पीव्हीआर’चे संस्थापक अजय बिजली यांनी आमिर खानसोबत हृद्य संवाद साधला. मनोरंजन जगतातील तीन दिग्गजांच्या उपस्थितीत "आमिर खान: सिनेमा का जादुगर" चा ट्रेलर प्रदर्शित झाला, जो बघताना प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि आमिरच्या कामगिरीविषयी आदर व्यक्त करणाऱ्या या जादुई महोत्सवाविषयीची त्यांची उत्सुकता अधिकच वाढली. या महोत्सवाला १४ मार्च रोजी, आमिर खानच्या वाढदिवशी प्रारंभ होईल आणि हा महोत्सव २७ मार्चपर्यंत सुरू राहील.
 
आमिर खानविषयी बोलताना जावेद अख्तर म्हणाले, "या चित्रपटसृष्टीत अनेक पात्रे आहेत. मला भीती वाटते की, त्यातील काहींना मी विसरेन. आमिरचा जन्म १९६५ मध्ये झाला, मी १९६५ मध्ये बॉलिवूडमध्ये कामाला सुरुवात केली. मी लिहिलेला आमिरचा पहिला चित्रपट होता. मी पाचगणीमध्ये नासिर हुसेनकरता 'फरियाज' हा चित्रपट लिहित होतो. आमिरला पाहिले आणि लगेचच नासिरला सांगितले की, आमिर हा एक स्टार आहे आणि त्याने एका रोमँटिक चित्रपटाद्वारे कारकीर्दीचा प्रारंभ करावा. आमिरचा पहिला चित्रपट जावेदने लिहिलेला होता. माझ्या मुलाचा पहिला चित्रपट आमिरसोबत होता."
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PVR Cinemas (@pvrcinemas_official)

पटकथा ऐकण्यासाठी फरहानला नकार दिल्यानंतर आमिर जावेद अख्तर यांच्या फोनची वाट बघत होता, असे त्याने जावेदजींना सांगितले. जेव्हा जावेद यांनी फोन केला नाही, तेव्हा आमिरला जाणवले की, फरहान त्याच्याशी बोलला नसेल आणि त्याचा खरोखरच आमिरवर विश्वास असावा.
 
या पात्रांवर आणि कथांवर फक्त आमिरच विश्वास ठेवू शकतो. आमिरने आशुतोषसोबत एक चित्रपट केला होता, त्याआधी त्याच्यासोबत केलेला चित्रपट फ्लॉप झाला होता. नवा दिग्दर्शक फरहान तुझ्याकडे तीन नायक असलेला चित्रपट घेऊन आला होता आणि तू तो केलास. कुस्तीत आपल्या मुलीकडून हरणाऱ्या एका म्हाताऱ्या माणसाची भूमिका असलेला ‘दंगल’ हा चित्रपट पूर्ण विचारांती कुणी केला असता? सर्व कलाकार ज्यांनी हिट चित्रपट दिले आहेत अशा दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये काम करतात. तू जोखीम घेतोस, तशी इतर कोणीही घेऊ शकत नाही." जावेद अख्तर पुढे म्हणतात.
ALSO READ: तनु वेड्स मनु' जोडी पुन्हा एकत्र येणार,कंगनाने माधवन सोबत शूटिंग पूर्ण केले
"आमिर खान: सिनेमा का जादुगर" हा महोत्सव देशभरातील ‘पीव्हीआर आयनॉक्स’ थिएटरमध्ये साजरा केला जाणार आहे, या महोत्सवादरम्यान चाहत्यांना मोठ्या पडद्यावर आमिर खानच्या अफलातून अभिनयाची जादू पुन्हा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. देशातील सर्वात मोठी आणि सर्वात दर्जेदार सिनेमा प्रदर्शन कंपनी म्हणून, ‘पीव्हीआर आयनॉक्स’ देशभरातील प्रेक्षकांकरता सर्वोत्तम मनोरंजन पेश करण्यासाठी वचनबद्ध आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती