Manoj Jaraange: मनोज जरांगे यांचे 24 तारखेपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन

बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (15:42 IST)
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे  पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली. त्यात मराठा आरक्षणात सगे सोयरे अध्यादेश लागू व्हावा या वरून आंदोलन सुरु आहे. काल विशेष अधिवेशन बोलावून राज्य सरकार ने मराठा आरक्षण 10 टक्के देण्याच्या एकमतावर निर्णय दिला. हा निर्णय आम्हाला मान्य  नसल्याची  प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

मनोज यांनी राज्य सरकार कडून या मागण्या केल्या आहेत. 
शासनाने सगेसोयऱ्यांच्या बाबतीत दोन दिवसात निर्णय घ्यावा, एक ओळीचा आदेश काढून ओबीसीत मराठांचा समावेश करा, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला मुदत वाढ द्या, कुणबी -मराठा एकच असल्याचा द्यावा, द्यावा, अंतरवलीसह  महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेणे या मागण्या जो पर्यंत पूर्ण होत नाही आम्ही आंदोलन सुरूच ठेऊ .

मनोज जरांगे  यांनी आज बैठकीत ठरवलं की येत्या 24 फेब्रुवारी पासून राज्यभरात रस्ते रोको आंदोलन करण्यात येईल.दररोज सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजे पर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल ज्यांना शक्य असेल त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 या कालावधीत रस्ता रोको करायचं. तसेच उद्या पासून मराठा समाजाच्या बांधवांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना आरक्षणासाठी निवेदन द्यायच.
आमच्या मागण्या पूर्ण होई पर्यंत आंदोलन सुरु असण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती