ते म्हणाले, तुम्हाला एखाद्याचे काम किंवा विचार आवडत नसतील तर त्याला नक्षलवादी म्हणून देण्याची प्रवृत्ती सध्या वाढत आहे. शहरी नक्षलवादी वारी पालखी सोहळ्यात दोन संस्थांची नावे पुढे आली आहेत. त्यातील एक लोकायत संस्था आहे. या संस्थेकडून अनेक चांगली कामे केली जात आहे. ही नक्षली संस्था नाही. चांगले काम करणाऱ्या आणि विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षलींचे शिक्के मारण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे.