पक्षांतर करणारे गावित बंधू-भगिनी पराभूत

काँग्रेसला रामराम करून सत्तेच्या आमीषाने पक्षांतर करणारे भाऊ-बहीण अर्थात निर्मला गावित (ईगतपूरी)तसेच भरत गावित (नवापूर) यांना मतदारांनी साफ नाकारले आहे. विशेष म्हणजे या भावंडाचे वडील माणिकराव गावित हे काँग्रेसतर्फे सलग नऊ वेळा खासदार म्हणून नंदुरबार मतदार संघातून विजयी झाले होते.
 
राज्याच्या राजकारणात पक्षांतराचे वारे वाहू लागल्यानंतर गावित बंधू भगिनींनीही काँग्रेसची साथ सोडत शिवसेना-भाजपाची वाट पकडली. निर्मला गावीत ईगतपूरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून दोनदा विजयी झाल्या. मात्र अलीकडेच त्यांनी शिवबंधन बांधले होते. मात्र त्यांना काँग्रेसच्याच हिरामण खोसकरांनी पराभूत केले. त्यांचे बंधू भरत गावीत यांनी भाजपात प्रवेश करत नवापूर मतदारसंघातून उमेदवारी केली. परंतू त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती