महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची बंटेंगे तो कटेंगे घोषणा प्रचंड गाजली आहे.ही घोषणा सध्या चर्चेचा विषय बनाली आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी या घोषणेचा विरोध केला आहे. तसेच भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी देखील या घोषणेचा विरोध केला आहे. आता भाजपच्या पंकजा मुंडे यांनी देखील या घोषणेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या वरुन भाजप आणि महायुतीमधील मतभेद समोर येत आहे.
विकास करणे हाच खरा मुद्दा असल्याचे त्या म्हणाल्या. नेत्याचे काम आहे या जगातील प्रत्येक व्यक्तीला आपले मानून घेणे आहे. अशा विषयाची महाराष्ट्रात काहीच गरज नाही. यूपी मध्ये स्थिति वेगळी आहे त्यांनी त्याच संदर्भात बोलले असावे असे त्या म्हणाल्या.त्यांच्या बोलण्याचा काय अर्थ आहे कळत नाही. पंतप्रधान मोदींनी जात-धर्माचा विचार न करता सर्वांना रेशन, घर आणि सिलिंडर दिले आहेत. असे त्या म्हणाल्या.