Chhagan Bhujbal Profile In Marathi : महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. छगन भुजबळ आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत. सध्या ते येवला विधानसभेचे आमदार आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.
त्यांच्या आईचा लहानसा गाळा होता.1973 मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली, त्यात ते विजयी झाले. 1973 ते 1984 या काळात ते मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते होते.त्यानंतर 1985 मध्ये महापौर झाले.
1991मध्ये बाळासाहेबांशी मतभेद झाल्यानंतर भुजबळांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसपासून वेगळे झाले आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये त्यांना प्रथमच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करण्यात आले.