माझी गाडी अडवणारे मराठा आंदोलक नव्हे पंकजा मुंडे यांचा खुलासा

मंगळवार, 30 एप्रिल 2024 (21:07 IST)
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सध्या सर्व पक्षाचे नेते प्रचार करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल बीड लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे माजलगावात प्रचारासाठी गेल्यानंतर यांच्या गाडीचा ताफा तब्बल दोन ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवला होता. एका खासगी वृत्तवाहिनी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्याच गाडीचा ताफा का अडविला जातोय? बीड मध्ये 40 उमेदवार फिरत असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर माझीच गाडी का अडवली जाते. या ताफ्यामध्ये 14-15 वर्षाची मुले असतात. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा माझ्या विरोधी असणारे राजकारणी नेते त्यांनी मुलांमध्ये जातीपातीची लढाई निर्माण होईल असे वागू नये. 

यावेळी दुसऱ्यांदा माझा ताफा अडवला आहे. हा मराठा आंदोलकांनी केला नसून तिऱ्हाईत लोकांनी केला असावा. याचे प्रमुख कारण म्हणजे आंदोलक हे नेहमी चर्चा करण्यासाठी तयार असतात मात्र असं न्हवते. त्यामुळे हा प्रायोजित कार्यक्रम असल्याचे नाकारता येत नाही. मराठा बांधवाना मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण मिळेल असा शब्द मी दिला आहे.मी कोणत्याही समाजात तेढ निर्माण होईल असे वागत नाही. माझ्या बाबतीत असा प्रकार घडावा हे पाहून मला वाईट वाटले. 

बीड लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या विरोधात उभ्या आहे. 

Edited By- Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती