अजित पवार गटाला धक्का, या नेत्याचे शरद पवार गुटाकडे प्रवेश

बुधवार, 20 मार्च 2024 (12:49 IST)
लोकसभा निवडणुकाच्या तारख्या जाहीर झाल्या आहे. निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला असून बीड लोकसभा मतदार संघातून भाजपच्या पंकजा मुंडे या उमेदवार आहे. तर अजितपवार गटाचे बजरंग सोनावणे देखील हे या ठिकाणाहून उमेदवार म्हणून इच्छुक होते. आता अजितपवार गटाला एक धक्का बसणार असून य गटाचे नेते बजरंग सोनावणे हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची चर्चा सुरु आहे. आज बजरंग सोनावणे हे दुपारी चार वाजेच्या दरम्यान शरद पवार गटात प्रवेश करू शकतात, या साठी शरद पवार यांनी बीड लोकसभा मतदार संघाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत बजरंग सोनावणे हे पक्षात प्रवेश करू शकतात. 

बीड लोकसभा मतदार संघाकडून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी मिळवण्याची इच्छा आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानन्तर सोनावणे हे अजित पवार गटात शामिल झाले होते. आता बीड मतदार संघाची उमेदवारी भाजप कडून पंकजामुंडे यांना देण्यात आली आहे. या मुळे सोनावणे शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस गटातून राजीनामा दिला असून त्यांनी सोशल दिल्यावर शेअर केलेले आहे. 
 
 Edited by - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती