लोकसभा निवडणुकाच्या तारख्या जाहीर केल्या आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीत गेले आहे. भाजप आणि मनसे युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज ठाकरे यांची अमित शाह यांच्या सोबत बैठक आहे. या नंतर राजठाकरे आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार गटाकडून रोहित पवार यांच्याकडून राज ठाकरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली जात आहे. ते म्हणाले राज ठाकरे यांनी माविआ सोबत यावे अशी इच्छा आहे. भाजपसोबत जाण्यापूर्वी त्यांनी विचार करावा. महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी माविआ सोबत यावे.
आता भाजप सोबत असलेल्या दोन पक्षांचा त्यांना फायदा दिसत नाही. महाराष्ट्रातील जनता भाजप सोबत नसल्याचे भाजपला लक्षात आले आहे. म्हणून लहान लहान पक्षांना ते आपल्या पक्षात शामिल करत आहे.
ज्या पक्षांना काहीही महत्त्व दिले जात नव्हते त्या त्या पक्षांची आठवण आता भाजपला येत आहे. अजित दादांच्या गटातील एका मंत्र्याने राजीनामा दिला असून ते कृषी खात्याशी निगडित आहे. अजित दादांच्या पक्षातील काही आमदार भाजपात जाणार तर काही आमदार आमच्या पक्षात येणार असे देखील रोहित पवार म्हणाले.