'१२ जून' ऐतिहासिक भेटीची तारीख ठरली

शुक्रवार, 11 मे 2018 (08:34 IST)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांच्या ऐतिहासिक भेटीची तारीख अखेर ठरली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत भेटीची तारीख जाहीर केली आहे. १२ जूनला सिंगापूरमध्ये किम जोंग यांची भेट घेणार असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली. तसेच दोघे मिळून जगात शांती राहावी यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असंही ट्रम्प यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी ट्वीट करत उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगशी  शिखर वार्ता सीमेवर पीस हाऊसमध्ये भेट होऊ शकते असे स्पष्ट केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा यांच्यातील ही पहिली शिखर वार्ता असणार आहे. या भेटीमुळे जगाच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडोमोडी घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष या दोन नेत्यांच्या भेटीकडे लागलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती