सीरियावर हवाईहल्ल्याचा ट्रम्प यांचा आदेश

शनिवार, 14 एप्रिल 2018 (09:50 IST)
सीरियातील रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिका आणि रशियामध्ये तणाव वाढला आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाईहल्ल्याचे आदेश दिलेत. तर त्याला फ्रान्स आणि ब्रिटेनने पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे रशियाने तिन्ही देशांना युद्धाचा इशारा दिला आहे.

सीरिया प्रकरणावरुन देशाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “सीरियाचा हुकूमशाह बशर अल असद यांच्या रासायनिक हल्ल्याचा लक्ष्य बनवून,  हल्ले सुरु करावेत, असे आदेश सैन्याला आदेश दिले आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “फ्रान्स आणि ब्रिटेनच्या मदतीने यासंदर्भात एक संयुक्त ऑपरेशन सीरियात सुरु आहे. यासाठी दोन्ही देशांचे मी आभार मानतो. हा हल्ला असद सरकारला सीरियामध्ये रशियाच्या रासायनिक शस्त्रास्त्रांच्या वापरास रोखण्यात अपयशी ठरल्याचा परिणाम आहे.” सध्या सीरियातील पूर्वी गोता प्रांतातील डुमामध्ये रासायनिक शस्त्रास्त्रांच्या वापराने तणाव वाढला आहे. या हल्ल्यात लहान मुलांसह एकूण 74 जणांचा मृत्यू झाला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती