खरं म्हणजे, एक वर्षांपूर्वी 'काला' चित्रपटाचा पोस्टर रिलीज झाला होता. त्यात, रजनीकांत थार जीपच्या बोनेटवर बसलेले होते. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून ही जीप आपल्या संग्रहालयात ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर रजनीकांत यांचा जावई आणि तमिळ स्टार धनुषने आनंद यांना रिप्लाय देत लिहिलं होतं की, 'शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ही जीप आपणास देण्यात येईल.'