Inauguration of the statue भारत-पाक सीमेवर शिवरायांचा पुतळा

मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (09:01 IST)
Inauguration of the statue काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळील 41 राष्ट्रीय रायफल्स (मराठा एलआय) संकुलात छत्रपती शिवाजी महाराजां Chhatrapati Shivaji Maharajचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्घाटन मंगळवार 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यादरम्यान सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हेही उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री सैनिकांसोबत दिवाळी मिठाईचा आस्वाद घेणार आहेत.
 
आम्ही पुणेकर संस्थेच्या पुढाकाराने काश्मीरमधील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबईतील राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुतळा झेंडा दाखवून कुपवाडा येथे रवाना केला.
 
महाराष्ट्रातून सुरू झालेला 2 हजार 200 किलोमीटरचा हा प्रवास आठवडाभरात कुपवाडा येथे पोहोचला. मार्गावर येणा-या प्रमुख शहरांतील ऐतिहासिक स्थळांचे पूजन करताना या पुतळ्याचेही स्वागत करण्यात आले. या पुतळ्याचे उद्घाटन मंगळवारी सकाळी 10 वाजता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अन्य मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
कुपवाडा येथील भारतीय लष्कराच्या छावणीतील या पुतळ्याच्या स्थानाचे भूमिपूजन यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशीच करण्यात आले. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड येथून पाच किलो माती व पाणी आणण्यात आले. ही मूर्ती साडे दहा फूट उंच आहे. पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावला आहे. पुतळ्यासमोरील डोंगराच्या पलीकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावर शिवाजी महाराजांचा चेहरा आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने दाखवण्यात आली आहे. यासाठी सुमारे 1 हजार 800 ट्रक माती भरण्यात आली. याशिवाय या भागातील हवामान व भूस्खलन लक्षात घेऊन पक्के बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती