दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग,या विविध मागण्यांसाठी एसटी संप पुकारण्यात आला होता. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी आज दिलेल्या एसटी बंदच्या आवाहन दिले .सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली.
उदय सामंत म्हणाले, एसटीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून एसटी कष्टकरी जनसंघाकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. गुणरत्न सदावर्ते हे कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मागणीसाठी सदावर्ते यांनी एसटी संप पुकारला होता. या संदर्भात मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. या बैठकीत चार मुद्द्यांवर चर्चा झाली त्या नंतर संप मागे घेण्यात आला. या दिवाळीला एसटी सुसाट वेगाने धावणार आहे.