विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (11:30 IST)
मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  3 नोव्हेंबर रोजी  जिल्ह्याधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
 
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी विभागाने भाडेतत्वावर जागा घेऊन तातडीने वसतीगृहे सुरू करण्याचे निर्देश देऊन त्याबाबतचा दर आठवड्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
 
 'महानगर असलेल्या मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रति वर्ष प्रति विद्यार्थी 60 हजार रुपये निर्वाह भत्ता, विभागीय ठिकाण, विभागीय मुख्यालय व 'क' वर्ग महापालिका असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रति वर्ष 51 हजार रुपये निर्वाहभत्ता देण्यात येणार असून अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी 43 हजार रुपये निर्वाहभत्ता तर तालुक्याच्या ठिकाणी 38 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे', अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती