भुतांची भीती घालवण्यासाठी स्मशात गटारीचे आयोजन

शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (16:14 IST)
दररोज पोलीस स्टेशनमध्ये एक तरी अशी तक्रार असते, ज्यामध्ये तरुणाईला ढोंगी बाबाद्वारे फसवले जाते. यालाच वाचा फोडण्यासाठी ठाण्यामधील विद्यार्थी संघटना एक रात्र भुतासोबत घालवून युवकांच्या मनातील भीती तसेच अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, वाशिंद येथील शिर्के गावात स्मशान भूमी आहे. असं मानलं जात की, अमावस्येच्या रात्री भुतं बाहेर येऊन स्मशान भूमीत नाचतात. याचीच भीती घालवण्यासाठी ११ ऑगस्ट या अमावस्येच्या दिवशी गटारी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. यामध्ये शेकडो लोकांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमात ढोंगी बाबा विज्ञानाचे प्रयोग दाखवून लोकांना कशी भुरळ पाडतात आणि लोक त्यावर कसा विश्वास ठेवतात. या सर्व गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न केला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती