दाऊदच्या मीना मंजील इमारत लिलाव

शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (11:08 IST)
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील भेंडी बाजारच्या पाकमोडीया स्ट्रीटवरील अमीना मंजील इमारत लिलावात सैफी बुरहानी ट्रस्टने तब्बल 3 कोटी 51 लाख रुपयांना घेतली. या इमारतीचाही पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
या इमारतीचे पूर्वीचे नाव मसूल्ला होते. दाऊदने ही इमारत विकत घेतल्यानंतर आईचे अमीना नाव इमारतीला दिले. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या लिलावात अखिल भारतीय हिंदू महासभा आणि दिल्लीतील वकील भूपेंद्र भारद्वाज यांनीही सहभाग नोंदवला. 25 लाख रुपये अनामत न भरल्याने हिंदू महासभेला लिलावात भाग घेता आला नाही. या आधी झालेल्या लिलावात भेंडी बाजारातील डामरवाला इमारतीतील काही गाळे आणि हॉटेल दिल्ली झायका या दोन्ही मालमत्ता सैफी बुरहानी ट्रस्टनेच लिलावात जिंकल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती