UNची दहशतवाद्यांची यादी जाहीर दाऊद आणि हाफिस चा समावेश

बुधवार, 4 एप्रिल 2018 (15:32 IST)
आपल्या देशाला आणि पूर्ण जगाला त्रास देत असलेल्या दहशतवादी यादी नवीन स्वरूपात प्रसिद्ध जाहली आहे. यामध्ये अनके नवीन संघटना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेष असे की दाऊद आणि हाफिस सय्यद देखील या यादीत समाविष्ट आहे. अमेरिकेनंतर आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांची ही यादी प्रसिद्ध केली आहे. यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदसह 139 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश आहे. यादीत पहिले नाव लष्कर ए तोयबाचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा उत्तराधिकारी अयमान अल-जवाहिरीचे आहे. जवाहिरी अजूनही अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेजवळ वास्तव्यास आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. तसेच जवाहिरीच्या साथीदारांची नावंही या यादीत आहेत. या यादीमुळे थोड्या प्रमाणात   भारताच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे पाकिस्तान मध्ये ठाण मांडून बसलेल्या या सर्वांवर लवकर कारवाई होऊ शकणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती