ग्वाल्हेरच्या जयारोग्य रुग्णालय समूहाचे अधीक्षक डॉ.आर.के.एस.धाकड म्हणाले, नवजात अर्भकामध्ये शारीरिक विकृती असून काही गर्भ अतिरिक्त तयार झाले आहेत,ज्याला वैद्यकीय शास्त्राच्या भाषेत इशिओपॅगस म्हणतात. यामुळे न जन्मलेल्या मुलामध्ये शरीराच्या खालच्या भागाचा अतिरिक्त विकास होतो. दशलक्ष मुलांपैकी एकाला ही समस्या उद्भवते.
अशा मुलांना शस्त्रक्रियेद्वारे सामान्य केले जाते, असे डॉ.धाकड यांनी सांगितले. या मुलीचे दोन अतिरिक्त पाय शस्त्रक्रिया करून काढण्यात येणार आहेत.सध्या नवजात बाळाची चाचणी करण्यात आली आहे. बाळ पूर्णपणे निरोगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.