सोशल मीडियावर एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला की ट्विटरवर 'वंशिका' (#Vanshika) ट्रेंड होऊ लागला.या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणीला फोनवर तिच्या ब्रेकअपची कहाणी सांगताना रडत आहे. केवळ दोन महिन्यांच्या नात्यानंतर तिच्या प्रियकराने तिला कसे नात्यातून काढून दिले हे ती सांगते. या काल्पनिक व्हिडिओला उत्तर म्हणून आता आणखी एक काल्पनिक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये 'बॉयफ्रेंड'ने दिलेले उत्तर दाखवण्यात आले आहे.