आर्थिक राजधानी मुंबई सह राज्यात आज 16 ठिकाणी मतदान

सोमवार, 29 एप्रिल 2019 (09:37 IST)
लोकसभा 2019 निवडणुकीची जोरदार राज्यात हवा आहे. राजकारणामुळे राज्यातील सर्व पक्ष मतदानाकडे लक्ष देत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि राज्यतील शेवटच्या टप्प्यासाठी आज 29 एप्रिल रोजी 17 मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरुष, तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार असून, आर्थिक राजधानी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात 332 तृतीयपंथीही मतदानाचा हक्क बजावतील. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यात सर्व ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तर या मतदानात अनेक दिग्जजांचे भविष्य मत पेटीत अर्थात ई व्ही एम मशीन मध्ये बंद होणार आहे. आज नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या 17 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.
 
मतदानासाठी सुट्टी बंधनकारक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुले इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी वर्गाला भर पगारी सुट्टी किंवा पुरेशी सवलत देणे बंधनकारक असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती