ए.बी.पी माझा वृत्तवाहिनीचा लोगो व ग्राफिक्स वापरून बनावट

सोमवार, 29 एप्रिल 2019 (09:36 IST)
व्हिडीओ पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची छगन भुजबळ यांची निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे. 
 
ए.बी.पी माझा या प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनीचा लोगो व ग्राफिक्सचा गैरवापर करून बनावट व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केला जात असून याबाबत कारवाई करण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि नाशिकचे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
 
निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, ए.बी.पी माझा या प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनीचा लोगो व ग्राफिक्सचा गैरवापर करून "छगन भुजबळ यांचा जाहीर माफीनाम्यातून गौप्यस्फोट" अशा आशयाच्या बातमीचा बनावट व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केला जात आहे. सदर व्हिडिओमध्ये उल्लेख असलेल्या कुठल्याही प्रकारचे पत्र किंवा माफीनामा मी दिलेला नाही असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
 
नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवार समीर भुजबळ व कुटुंबियांबद्द्ल मतदारांमध्ये गैरसमज पसरविण्यासाठी व त्याद्वारे निवडणुकीत गैरफायदा घेणेसाठी हे विरोधकांचे षडयंत्र आहे. भुजबळ कुटुंबीयांना एनकेन प्रकारे बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. त्यामुळे सदर व्हिडिओ बनवणारे व हा व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करावे तसेच अशा प्रकारे पोस्ट प्रसारित होणार नाही याबद्दल तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याची प्रसिद्धी समाजमाध्यमे व प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती