गवळीच्या अखिल भारतीय सेनेने दक्षिण मुंबईचे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना पाठिंबा जाहीर केला असून, यासंदर्भात अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी, मुलगी गीता गवळी आणि विजय अहीर यांच्याशी महायुतीचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर आणि बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली आहे. यावेळी गीता गवळी यांनी त्यांचा पक्ष हा महायुतीला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.