रणजितसिंह मोहिते पाटील भाजपत

बुधवार, 20 मार्च 2019 (09:25 IST)
राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पहिले अध्यक्ष रणजितसिंह मोहिते पाटील हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे माढा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात आणि विशेषत: माढा लोकसभा मतदारसंघ जबर धक्का बसला आहे.
 
मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लब हाऊसमध्ये आज दुपारी 12.30 वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रणजितसिंह मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. स्वत: रणजितसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत  सोलापुरात माहिती दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती