राष्ट्रवादी कॉंग्रेसची पहिली यादी मात्र माढाची जागा कोण लढवणार हे स्पष्ट नाही

गुरूवार, 14 मार्च 2019 (17:13 IST)
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ५ उमेदवारांची यादी जाहीर केली आणि आघाडी सोबत घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली असे सांगितले जरी असले तरी माढा मतदार संघातून कोण उभे राहणार हे अजूनही स्पष्ट केले जात नाहीये. त्यामुळे शरद पवार यांचे नातू पार्थ पवार हे नेमके कोणत्या मतदार संघातून उभे राहणार आणि माढा तून कोण निवणूक लढवणार हे स्पष्ट होत नाहीये. 
 
दुसरीकडे यादीनुसार आता कोल्‍हापूर : खा.धनंजय महाडीक, सातारा : उदयनराजे भोसले, बारामती येथून शरद पवार यांच्या सुपुत्री सुप्रिया सुळे , कल्‍याण : बाबाजी पाटील ,रायगड येथून सुनील तटकरे, ठाणे येथून आनंद परांजपे आणि उत्तर महाराष्ट्रातून जळगाव : गुलाबराव देवकर या सर्वांची नावे निश्चित केली गेली आहे. त्यामुळे आता पुढची यादी जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा नेमके कोणती नावे येतात हे पाहवे लागणार असून या निवडणुकीत आघाडी विरोधात सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा असणार आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती