काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 21 उमेदवारांची घोषणा केली असून त्यात महाराष्ट्रातील 5 तर उत्तर प्रदेशातील 16 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, डॉ. नामदेव उसेंदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महाराष्ट्रातील सोलापूर मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे निवडणूक लढणार आहेत. काँग्रसध्ये दाखल झालेल्या नाना पटोल यांना नागपूर मतदार संघातून उमेवारी देण्यात आली आहे. याशिवाय, उत्तर-मध्य मुंबईतून प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघातून डॉ. नामदेव उसेंदी निवडणूक लढणार आहेत. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.