कॉंग्रेस ने सर्व दिले वडिलांनी सुजय यांना समजवायला पाहिजे होते - थोरात

बुधवार, 13 मार्च 2019 (18:12 IST)
विखे कुटुंबाने काँग्रेस पक्षाकडे जे काही अपेक्षा केली ते त्यांना दिलं गेले आहे. म्हणून मुलाने हट्ट केला, तर वडिलांनी त्याला समजवावून सांगायला हवे होते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. 
 
थोरात म्हणाले की “डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा विरोधी पक्षनेत्यांनी सर्वात आधि निषेध करायला हवा आहे. तर विखे पाटलांनी नैतिकता म्हणून लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करायला हवी आहे.”, तर भाजपच कमळ हातात घेताच  सुजय विखेंचे अचानक सूर वेगेळे झाले आहेत. भाजपविरोधात टीका करणारे आता त्याच पक्षाची विचारधारा आडल्याचे सांगत आहेत.”असेही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. विखे कुटुंबाने काँग्रेसकडे जे मागितलं, ते पक्षाने दिलं. मुलाने हट्ट केला, तर वडिलांनी समजावायला हवं होतं, असे म्हणत बाळासाहेब थोरातांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती