छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत 16 नक्षलवादी ठार झाले आहेत. INSAS आणि SLR सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. एका वर्षात आतापर्यंत 410
मिळालेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, केरळपाल पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात ही चकमक झाली. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक घडली.
केरळपाल परिसरात माओवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये अधूनमधून चकमकी सुरू आहेत. चकमकीच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा दलांचे शोध अभियान सुरू आहे.