दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कारगिल युद्धातील जवानांना श्रद्धांजली दिली असून त्यांनी या दिवसाच्या आठवणीत ट्विट केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, संपूर्ण जगाला माहिती असलेल्या इतिहासातील काही काळापूर्वी घडलेल्या आणि सर्वात आव्हानात्मक परिस्थितीतील या युद्धात विजय मिळवणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला मी सलाम करतो. तर गृहमंत्री अमित शहा यांनी, कारगिल विजय दिन हा भारताचा अभिमान, पराक्रम आणि खंबीर नेतृत्वाचे प्रतिक आहे. कारगिलच्या डोंगरांवरुन शत्रूला पिटाळून लावत तिथे पुन्हा तिरंगा फडकवणाऱ्या जवानांच्या धैर्याला मी अभिवादन करतो. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्वपणाला लावणाऱ्या या नायकांचा देशाला अभिमान आहे, असे नमूद केले आहे.Paid tributes to fallen soldiers of the Indian Armed Forces who exhibited exemplary valour and made supreme sacrifice during Kargil War.#CourageInKargil pic.twitter.com/0QfXMemss3
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 26, 2020
वाळू शिल्पकार प्रयागराज यांनी कारगिल युद्धातील सैनिकांचे शौर्य दर्शवणारे वाळू शिल्प बनवून कारगिल युद्धाच्या २१ वर्षपूर्तीच्या निमित्ताने शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे.On the 21st anniversary of Kargil Vijay, I would like to salute the brave soldiers of the Indian Armed Forces who fought the enemy under the most challenging conditions that the world had witnessed in the recent history: Defence Minister Rajnath Singh#KargilVijayDiwas pic.twitter.com/VJ341KeqxQ
— ANI (@ANI) July 26, 2020
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कारगिल दिवस निमित्ताने दिल्लीतील विजयस्तंभ येथे जाऊन शहीद जवानांना अभिवादन केले.Sand artists in Prayagraj pay tribute to the soldiers on the occassion of #KargilVijayDiwas . pic.twitter.com/IVeN98Cjbd
— ANI UP (@ANINewsUP) July 26, 2020
भारताने पाकिस्तानविरोधात कारगिल युद्धात विजय मिळवण्याच्या घटनेला आज २१ वर्ष पूर्ण झाली आहे. १९९९ साली हे कारगिल युद्ध झाले होते. या युद्धात शहीद झालेल्या जवानांचो हौतात्म्य कधीही विसरता येणार नाही. त्यांना आजच्या दिवशी देशभरातून विविध प्रकारे श्रद्धांजली दिली जात आहे.Delhi: Defence Minister Rajnath Singh, MoS Defence Shripad Naik and three service chiefs pay tribute at the National War Memorial on the 21st anniversary of India's victory in the Kargil War. pic.twitter.com/Mf14KJ0ENh
— ANI (@ANI) July 26, 2020