ती व्हायरल होणारी सुंदरी आहे तरी कोण?

मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018 (09:41 IST)
कालपासून फेसबुक असो कि व्हाट्सअप सगळीकडे एकाच तरुणीचा बोलबाला आहे. तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 26 सेकंदाच्या या व्हिडीओने खासकरून तरुणांना घायाळ केले आहे. यामधील हि 'सुंदरी' कोण? याविषयी सर्वत्र चर्चा सुरु आहे. तर ती एक मल्याळम अभिनेत्री असून तिचे नाव प्रिया प्रकाश वारियनर असे आहे.
 
व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रियाच्या ‘उरू अदार लव्ह’ या आगामी सिनेमातील ‘Manikya Malaraya Poovi’ या गाण्यातील आहे. या व्हिडीओमध्ये ती डोळ्यांच्या हावभावातून आपलं प्रेम सांगताना दिसत आहे. येत्या 3 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती