जिओकडून डेली डाटा वापरासाठी ‘जिओ क्रिकेट पॅक’ लॉंच

बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (10:14 IST)
रिलायन्स जिओने डेली डाटा वापरासाठी 251 रुपयांचा एक चांगला प्लॅन आणला आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 51 दिवसांची आहे. यास ‘जिओ क्रिकेट पॅक’ नाव देण्यात आले आहे.
 
यामध्ये रोज 2जीबी डाटाची सुविधा आहे. हा केवळ डाटा प्लॅन आहे. यामध्ये युजर्सला कॉलिंग किंवा एसएमएसची कोणतीही सुविधा नाही. म्हणजे याचा वापर तुम्ही केवळ डाटासाठी करू शकता. जिओने खास क्रिकेट प्रेमींचा विचार करून हा सादर केला आहे. हा क्रिकेट डाटा पॅक आहे. याचा वापर युजर्स क्रिकेट मॅच पाहण्यासाठी करू शकतात.  
 
जिओने यूजर्ससाठी जिओ कॅशबॅक 2020 ची घोषणा केली होती. या ऑफर अंतर्गत युजर्सला डिजिटल पेमेन्टद्वारे आपला मोबाईल नंबर रिचार्ज केल्यावर 2,020 पर्यंत कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे. परंतु, या ऑफरचा लाभ केवळ डिजिटल पेमेंटवरच उपल्ब्ध आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती