जवळपास आठ लाख भारतीय महिला आणि पुरुषांनी विवाहबाह्य संबंधांसाठी डेटींग एपचा वापर केल्याचे उघड झालं आहे. याबाबतचा एक रिपोर्ट समोर आला आहे. यात जानेवारी महिन्यात या डेटींग एपमध्ये सर्वाधिक युजर्स नोंदवले गेले. तर 2019 च्या नोव्हेंबर महिन्यात बंगळूरु, मुंबई, कोलकाता, पुणे, नवी दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद, गुडगाव, जयपूर, चंदीगढ, लखनऊ, कोच्ची, विशाखापट्टनम, नागपूर, सूरत, इंदौर या ठिकाणाहून सर्वात जास्त युजर्सची संख्या नोंदवली गेली.