भारतीयांनी अॅप डाऊनलोड करण्याचे प्रमाण सन 2016 च्या तुलनेत तब्बल 195 टक्के वाढले आहे. ही वाढ जागतिक पातळीवर 45 टक्के आहे. याच कालावधीत प्रगत देश असलेल्या अमेरिकेत हे प्रमाण अवघे 5 टक्के आहे, तर चीनमध्ये सर्वाधिक 80 टक्के आहे. 2019 मध्ये जगभरातील 204 अब्ज ग्राहकांनी विविध अॅप्स डाउनलोड केल्याचे या अहवालात म्हटले आहे.
4 पैकी 3 जण गेम्सच्या व्यतिरिक्त अन्य अॅप डॉऊनलोड करतात. हे प्रमाण तब्बल 95 टक्के आहे. भारतात गुगल पे, अॅमेझॉन, एमएक्स प्लेअर आणि टिकटॉक हे अॅप्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत.